भाजप युवा नेते महेश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश – सुजित गार्डनसह ढावरे लाईन व सिद हॉस्पिटल समोर मुरूम टाकून दिलासा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज : शहरातील सुजित गार्डन मागील रस्ता, ढावरे लाईन व सिद हॉस्पिटल समोरच्या रस्त्यांची अवस्था पाइपलाईन, ड्रेनेजच्या कामानंतर अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले होते.
या समस्येची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेश शिंदे यांनी नगर परिषदेकडे तक्रार दाखल करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

सदर तक्रारीवर नगरपरिषदेकडून तत्काळ कार्यवाही करत संबंधित ठिकाणी मुरूम टाकण्यात आला आहे. थोड्याच वेळात मुरूम हातरून रस्ते व्यवस्थित केले जातील. यामुळे नागरिकांचा तात्पुरता त्रास कमी झाला असून वाहतुकीस काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
“नागरिकांचा त्रास कमी करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत अशा प्रकारचे प्रयत्न सुरू राहतील,” असे भाजप युवा नेते महेश शिंदे यांनी सांगितले.



