करमाळा तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्ष पदी जगताप गटाचे महादेव डुबल

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
:- करमाळा तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्ष पदी जगताप गटाचे निष्ठावंत समर्थक महादेव डुबल यांची बिनविरोध निवड झाली आहे . बैठकीच्या अध्यक्ष स्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप होते .

याप्रसंगी संघाचे मार्गदर्शक संचालक तथा माजी आमदार जयवंतराव जगताप , संचालक शहाजी शिंगटे , दादासाहेब लबडे , मज्जीद खान , किशोर भगत , वैजीनाथ कदम , संभाजी रिटे , दादासाहेब कोकरे , महेश कांबळे , हनुमंत ढेरे , बबन मेहेर , महादेव धोंडे यांचे सह मार्केट कमिटीचे संचालक जनार्धन नलवडे , तात्यासाहेब शिंदे , रामदास गुंडगीरे , शिवाजी राखुंडे , महादेव कामटे ,करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे , हरीदास डुबल , छबनराव जाधव , बबुशा केकान , संघाचे व्यवस्थापक विठ्ठल तोरणे , दादासाहेब पुजारी , डिसीसी बँकेचे सिनीयर बँक इन्स्पेक्टर आण्णा आवटे , अनिल सुरवसे , दिगंबर रासकर आदी उपस्थित होते .

निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप , अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी डुबल यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या . खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी डुबल यांची निवड झाल्यामुळे कंदर व बिटरगाव वांगी परिसरात त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे .



