एकही काव्यसंग्रह नाही तरीही कवी म्हणून महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात ओळख असणारा अवलिया – महेश बजरंग कोळेकर

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
महेश बजरंग कोळेकर मुख्यतः हे काक्रंबावाडी ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद इथले राहणारे. संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण हे दयानंद वाणिज्य महाविद्यालय सोलापूर येथे पूर्ण झाले. आणि तिथूनच त्यांना काव्यलेखन ची आवड निर्माण झाली. कॉलेज चे मॅगझीन असेल तिथे यांच्या कविता असायच्या. कुठे सोलापूर शहरात काव्यवाचन स्पर्धा असेल तिथे यांचा नंबर यायचा. कुठे छोटीमोठे कार्यक्रम असतील तिथे लोक यांना कविता सादर करण्यासाठी बोलवायचे.
शाळेतील लहान मुलांपासून ते कॉलेज च्या प्राध्यापक पर्यंत यांची एक कवी म्हणून ओळख. त्यांनी आपल्या स्वतःच्या तुळजापूर तालुक्यात कोविड-19 काळात लसीकरण मध्ये ही सामाजिक कार्य केले. वृक्षारोपण, स्वच्छता, अनेक जनजागृती संदेश, शेतकरी मित्र म्हणून ही भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांना , शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी ही खूप सारे उपक्रम राबवले.
या महेश बजरंग कोळेकर यांनी केलेल्या कार्याची दखल ही तेथील न्यूज पेपर आणि न्यूज चॅनेल ही घेतली. आज सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात त्यांची एक कवी, लेखक, आरोग्यमित्र, युवा समाजसेवक, शेतकरिमित्र म्हणून ओळख आहे. या सर्व गोष्टीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं कवी मन आणि कवी म्हणून झालेली दोन जिल्ह्यात प्रसिद्धी. होय कवी म्हणून झालेली प्रसिद्धी. विशेष म्हणजे त्यांचा एकही काव्यसंग्रह नाही किंवा कवितासंग्रह पाहायला मिळत नाही. पण सोशलमीडिया वर मात्र त्यांच्या कविता खूप गाजतात. आणि वाचक ही खूप मोठा प्रतिसाद देतात.
आजही त्यांच्या कवितेच्या ओळी कित्येक शाळा, महाविद्यालय आणि पोलीस भरती करणाऱ्या मुलांच्या क्लासेस मध्ये लिहिल्या जातात. आता अलीकडे मध्येच त्यांची फक्त दोन ओळींची कविता सोशल मीडिया यावर मोठ्या प्रमाणात गाजली होती. ती कविता अशी होती,” आयुष्याची लढाई अजूनही बाकी आहे, माझं स्वप्न तर खाकी आहे.” अशा आशयाची ती पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी अशी कविता होती. पोलीस भरती करणाऱ्या कित्येक मुलामुलींनी आपलं स्टेटस ठेऊन विविध सोशल मीडिया माध्यमातून ती पोस्ट केली होती.
या त्यांच्या कवितेच्या ओळी पोलीस भरती करणाऱ्या मुलामुलींच्या क्लासेस मधील फळ्यावर सुद्धा लिहिन्यात आल्या होत्या. म्हणूनच आज त्यांची ओळख पुस्तकातील कवी म्हणून नाही तर जनसामान्यांमधील कवी म्हणून आहे. अशा कित्येक कविता त्यांच्या सोशलमीडिया च्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या.
त्यातीलच आणखीन एक कविता म्हणजे,
” मित्रांनो, अयुष्याचा अर्थ असता इतका सोपा, तर त्या इंजिनिअर यांनी सुद्धा चिमणीसारखा बांधला असता खोपा। आपल्या कष्टाच्या घामाचा सुगंध तो छान, आपलं आयुष्य म्हणजे धनुष्य आणि आपण त्यात ताणलेला बाण। अशा प्रेरणादायी कवितेमुळे त्यांची आज उस्मानाबाद आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यात कवी म्हणून ओळख आहे. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प च्या माध्यमातून तरुणांना कविता कशी लिहावी, विषय निवड, सादरीकरण यावर ही खूप सारे मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
आज ही त्यांनी घडवललेले तरुण काव्यलेखन, काव्यवाचन मध्ये अव्वल येतात. असे हे एकही काव्यसंग्रह नसणारे पण संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मित्रपरिवार च्या साथीने कवी म्हणून प्रसिद्ध असेल कवी महेश बजरंग कोळेकर होय



