शहर

डहाणू येथील तरुणीचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीच्या पश्चिम बंगालमध्ये मुसक्या आवळण्यात डहाणू पोलीस निरीक्षक रणवीर बयेस व पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

डहाणू लोणीपाडा येथे लवइन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका (26) वर्षीय तरुणाने आपल्याच (22) वर्षीय प्रियसीचा डहाणू लोणीपाडा येथे गळा दाबून खून करून पश्चिम बंगाल येथे पलायन केले होते. या आरोपीच्या पश्चिम बंगाल मध्ये जाऊन मुसक्या आवळण्यात डहाणू पोलिसांना यश आले असून सध्या हा आरोपी डहाणू पोलीस ठाण्यात जेरबंद आहे.
हा खून 15 मार्च 2024 रोजी डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील लोणीपाडा चाळ नंबर 4 येथे झाला होता.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू अंकिता कणसे डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस व डहाणू पोलिसांनी पाहणी करून अज्ञात इसमाविरुद्ध 15 मार्च 2024 रोजी रोजी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याबाबत सबळ पुरावे उपलब्ध नसताना देखील पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट तसेच डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी डहाणू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे, पोलीस नाईक मनोज भरसट, पोलीस शिपाई सुरज लोहार यांचे तपास पथक तयार केले होते. या तपास पथक पोलीस अधिकाऱ्यांकडे कुठलाच पुरावा उपलब्ध नसताना देखील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून पश्चिम बंगाल येथे जाऊन बागदा चांद नगर डायमंड हरबर जिल्ह्यातून (22) वर्षीय अनिशा रेड्डी उर्फ अलिशा खातून हिचा गळा दाबून खून करणारा आरोपी मीना जोमीन मोल्हा याला त्यांच्या नातेवाईकांकडून पश्चिम बंगाल येथे शनिवारी अटक करून डहाणू पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आले आहे. सद्या हा आरोपी डहाणू पोलीस ठाण्यात जेरबंद आहे.

सदरची यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयसे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे, पोलीस नाईक मनोज भरसट, पोलीस शिपाई सुरज लोहार या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button