काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीत सोलापूर जिल्ह्याला झुकते माप– सुशिलकुमार शिंदे- धवलसिंह मोहिते पाटील,रामहरी रुपनवर,व प्रणिती शिंदे यांचा समावेश

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
काँग्रेस पक्षाच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीवरील 75 सदस्यांची नुकतीच निवड झाली असून त्यामध्ये 25 सदस्य आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला झुकते माप मिळाले असून चौघांचा समावेश आहे देशाचे माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर , सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, व आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे
आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी राहील त्याकरिता काय ठोस नियोजन करता येईल या दृष्टीने ही कमिटी धोरण आखणार असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने 900 जणांचे राष्ट्रीय कमिटी तयार केली आहे ज्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,आमदार प्रणिती शिंदे ,जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, यांची पहिल्या 75 सदस्यांमध्ये समावेश केला असून
या 75 सदस्यांमध्ये वरील तिघांचा क्रमांक 60, 61, 62 ,असा आहे 25 स्वीकृत सदस्य मध्ये माजी आमदार ॲड.रामहरी रुपनवर यांची वर्णी लागली आहे राहुल गांधी यांच्या “भारत जोडो यात्रे “नंतर काँग्रेस येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने फोर्स नियोजन करत आहे. रायपूर येथे दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान “ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे “राष्ट्रीय अधिवेशन होणार असून त्यानुसार पक्षाचे आगामी रणनीती कशी राहील आणि कोणत्या मुद्द्यावर विरोधकांना कोंडीत पकडता येईल आणि काँग्रेस पक्षाचे संघटन कसे मजबूत करता येईल यावर ही वरील समिती काम करणार आहे.



