पालघर जिल्ह्यातील सातपाटी शिरगाव समुद्रावर 17 वर्षीय युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :703051640
समुद्रावर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या सहा मित्रा पैकी एका 17 वर्षीय युवकाचा सातपाटी शिरगाव समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पालघर जिल्ह्यात घडली आहे.
उमेद इमरान शेख व वर्ष 17 असे या युवकाचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी होता.
गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी दुपारी आपल्या गल्लीमध्ये राहणाऱ्या अन्य पाच मित्रांसोबत तो सातपाटी शिरगाव समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता.
क्रिकेट खेळून झाल्यानंतर हे सर्व मित्र पोहण्यासाठी गेले असताना समुद्रातून येणाऱ्या विशाल काय लाटांच्या प्रवाहात उमेद शेख वाहून जात असताना त्याला त्याचा मित्रानी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु जोरदार ताटांच्या प्रवाहामुळे उमेदला वाचवण्यात त्याचा मित्रांना अपयश आल्यामुळे उमेदचा या समुद्रात वाहून जाऊन मृत्यू झाला आहे.
उमेद शेख याच्या मृतदेहाचा सातपाटी पोलीस आणि ग्रामस्थ कसून शोध घेत आहेत.



