शहर

अकलूजजवळील गणेशगाव पाटी येथे अनैतीक संबंधचा संशय घेऊन वृद्धाची निघृण हत्या.परिसरात हळहळ

उपसंपादक फरहान मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

गणेशगाव पाटी, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर

वृद्ध सिन्नाप्पा व्यंकू वाघमोडे यांचा मृतदेह शेताजवळ आढळला माळशिरस तालुक्यातील अकलूज जवळील गणेशगाव पाटी येथे सिन्नाप्पा व्यंकु वाघमोडे (वय ६० वर्षे) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह आज सकाळी शेताजवळील झाडाझुडपात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मयत: सिन्नाप्पा व्यंकु वाघमोडे

वय: ६० वर्षे

रा. गणेशगाव पाटी, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर

घटनास्थळी अकलूज पोलिसांनी भेट दिली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टेम) अकलूज ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र: आत्महत्या अपघाती मृत्यू

किंवा अन्य कोणताही गुन्हा या शक्यतांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यात हाकीकत अशी की, दिनांक 19/06/2025 रोजी रात्री 09/00 वा. ते दिनांक 20/06/2025 रोजी सकाळी 07/00 वा. चे दरम्यान  बाळू सिन्नाप्पा वाघमोडे यांचे वडील सिन्नाप्पा व्यंकु वाघमोडे यांच्या शेतामधील बांधकाम सुरु असलेले नवीन बंगल्यात झोपले असताना संतोष बाळासाहेब वाघ, रा. लवंग ता. माळशिरस जि. सोलापुर याने बाळू वाघमोडे यांचे वडील सिन्नाप्पा व शेतमजूर महिला नुतन जाधव यांचेमध्ये अनैतीक संबंधचा संशय घेऊन सिन्नाप्पा यांना कोणत्यातरी धारदार हत्याराने डोक्यात, हातावर, पायावर, छातीवर, चेहऱ्यावर वार करुन जीवे ठार मारल्याची बाळू सिन्नाप्पा वाघमोडे यांची खात्री आहे म्हणून संतोष बाळासाहेब वाघ, रा. लवंग ता. माळशिरस याचेविरुध्द फिर्याद दाखल केली आहे .

गावातील ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या वाघमोडे यांच्या निधनामुळे स्थानिक ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले. अनेकांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान वाघमोडे कुटुंबीयांनी घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारास कडक शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

मात्र: आत्महत्या अपघाती मृत्यू

किंवा अन्य कोणताही गुन्हा या शक्यतांचा तपास सुरू असल्याची माहिती अकलूज पोलिसांनी दिली आहे.

पुढील तपास तपासीक अधिकारी सपोनि चौधरी सो. मो. नं. 9594045684 दाखल अधिकारी सपोनि लंगुटे सो. मो.नं. 9623278915 हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button