शहर

पर्यटनाच्या माध्यमातून पालघर जिल्हा समृद्ध करणार..खासदार-राजेंद्र गावित.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यामध्ये वसई किल्ला, अर्नाळा किल्ला, शिरगाव, सातपाटी, केळवे, एडवन, महालक्ष्मी, डहाणू, बोर्डी, व जव्हार ह्या सारखे बीच व हिल्स पर्यटन क्षेत्र येतात पालघर मध्ये समृद्ध किनारपट्टी अबाधित डोंगर दऱ्या असलेले नैसर्गिक पर्यटन क्षेत्रचा आराखडा कोकण पर्यटन विभाग उपसंचालक व पर्यटन उप अभियंता यांच्या समोर ठेवून कोकणा प्रमाणेच पालघर जिल्ह्याचा विकास करण्यासठी जिल्हा स्तरावर पर्यटन विभागाचे कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित ह्यांनी पालघर येथे झालेल्या बैठकीत गुरुवारी सांगितले.
सातपाटी बंदराचा विकास करण्यासठी केंद्रीय मत्स्यव्यवसाय विकास विभाग मार्फत 267 कोटी रु मंजूर आहेत. पर्यटन विकास मधून वसई किल्ल्या करता 1 कोटी 40 लक्ष तत्त्वतः मंजूर करण्यात आला असून पालघर जिल्यातील ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्रातील विकासाचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्री यांचे कडे पाठविण्यात आला आहे. त्याच बरोबर अर्नाळा किल्ला हे सागरी बेट असून सागरीतटा पासून अर्नाळा किल्ला पर्यंत सगरिसेतु जोडणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी पार पडलेल्या या बैठकीत खासदार गावीत सह हनुमंत हेडे उप संचालक, उप अभियंता कोकण पर्यटन विभाग तसेच इतर सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button