तीन दिवसात नियोजन, महेश शिंदे साठी २०१ रक्तदाते, आणि एक संदेश – माणुसकी श्रेष्ठ!

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सामाजिक कार्याच्या प्रेरणादायी वाटचालीतून एक वेगळी ओळख निर्माण करणारे युवा नेते महेश भाऊ शिंदे यांनी यंदाही आपल्या वाढदिवसाचा उत्सव साजरा न करता, सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.
‘मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसात नियोजन करून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात यंदा २०१ रक्तदात्यांनी सहभाग घेत समाजसेवेचा खरा अर्थ लोकांसमोर ठेवला. वर्षानुवर्षे हा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादासह पार पडतो आहे, ज्यामुळे महेश शिंदे यांची ओळख ‘रक्तदान करणारा युवा नेता’ म्हणून समाजात निर्माण झाली आहे.

गेल्या सहा वर्षांत त्यांच्या या उपक्रमात एकदा शंभरपेक्षा अधिक, दोनदा दीडशेच्या वर, तर मागील तीन वर्षांपासून सलग २०० च्या वर रक्तदात्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर समाजाच्या सेवेसाठी उभ्या असलेल्या एकतेचे प्रतीक आहे.
शिंदे यांच्या रक्तदान शिबिरांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक निस्वार्थपणे सहभागी होतात. हे त्यांच्या कार्यात असलेल्या निष्कलंक सेवाभाव आणि जात-पात विरहित माणुसकीच्या दृष्टिकोनाचे द्योतक आहे. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा न घेता, रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रक्ताच्या रूपात ‘देणं’ देणारा नेता म्हणून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

“हे सर्व मी माझ्या मित्रांच्या व कार्याच्या जीवावर केले. माझे मित्र माझ्यासाठी जीवाचं रान करतात. ते माझ्या कार्याची जात-धर्म बघत नाहीत, फक्त माझ्यासाठी प्रामाणिक काम करतात.”
– महेश भाऊ शिंदे, युवा नेते



