महाराष्ट्र

सार्वजनिक गणेश उत्सव निमित्त माळीनगर येथे हॉलीबॉल डे (पासिंग) स्पर्धेचे आयोजन

विशेष प्रतिनिधी…रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो नं 99 21 500 780

दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र उर्फ (रंजनभाऊ) गिरमे ,यांचे मार्गदर्शनाखाली आज दि २४/०९/२०२३ रोजी मॉडेल हायस्कुलच्या मैदानावर आयोजित केलेल्या माळीनगर हॉलीबॉल डे(पासिंग) स्पर्धेचे उद्घाटन दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार पृथ्वीराज भोंगळे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शुगरकेन सोसायटीचे व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, दि मॉडेल विविधांगी प्रशालेचे पर्यवेक्षक व दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार रितेश पांढरे सर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, पिंकलाइन आईस्क्रीम पार्लर चे मालक मेजर दादासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्ते अजित बोरावके,पुष्कराज जाधव प्रॉम्प्ट टेलरचे मालक बाळू कणगी, अहिल्या ड्रेसेस चे मालक पोपट गोफणे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता लवटे,सोनवणे सर,अनिल नलवडे, असलम शेख, सकल मराठा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष चंद्रकांत काळे,बाळा देशमाने,K G N ग्रुप माळीनगर चे सचिव अब्दुलरोफ शेख,आदी मान्यवर व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संग्राम भोसले यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान माळीनगर हॉलीबॉल क्लब च्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.

आभार : बाजीगर शेख यांनी मानले, याप्रसंगी इम्रान मुजावर, प्रफुल कांबळे ,साहिल वजाळे, रजत कांबळे, संकेत ओव्हाळ, यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button