सफाळे विटीलाईन मेन रस्त्यावरील माकणे नूतन नगर स्पीड ब्रेकर अपघातांना ठरतोय कारणीभूत… ग्रामस्थांची रबर रंबल स्पीड ब्रेकरची मागणी..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
सफाळे व्हीटी लाईन रस्त्यावर पंधरा दिवसांपूर्वी अचानक टाकण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर मुळे वाहनधारकांना वाहतूक करताना या रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसात या स्पीडब्रेकर मुले या रस्त्यावर आठ ते दहा मोटरसायकल स्वारांचा अपघात झाला आहे.
हा उंच स्वरूपाचा स्पीड ब्रेकर अपघातांना निमंत्रण देणारा असल्या कारणामुळे हा स्पीड ब्रेकर काढून टाकून या ठिकाणी काळया पिवळ्या पट्ट्या असलेला रबर रंबल स्पीड ब्रेकर टाकण्यात यावी अशी मागणी सफाळे येथील वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.30 मार्च 2025 रोजी घाई गडबडीमध्ये निसर्गवासी काळूराम काका धोधडे सफाळे पूर्व-पश्चिम या उड्डाणपुलाचे उद्घाटन करून हा उड्डाणपूल वाहतूक दारांसाठी खुला करण्यात आला आहे.

या उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणारी जड वाहने यांना लगाम घालण्यासाठी नूतन नगर मेन रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात आला आहे. हा स्पीड ब्रेकर घाईगडबडीत टाकून या स्पीड ब्रेकरला बाजूपट्टी, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग, व दिशादर्शक रेषा तसेच डार्क रंगाचे पांढरे पट्टे न काढल्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या पंधरा दिवसापासून या स्पीडब्रेकर मुले विराथन बुद्रुक, जलसार,नांदगडीपाडा विठ्ठलवाडी, अशा अनेक गावातील वाहतूकदार यांचा अपघात होऊन ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
यामुळे हा स्पीड ब्रेकर लवकरात लवकर काढून टाकण्यात यावा व या ठिकाणी रबर रंबल काळ्या पिवळ्या पट्टा असलेला स्पीडब्रेकर टाकण्यात यावा अशी मागणी वाहतूक दारांकडून करण्यात येत आहे.



