पालघर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा वायरमन राजेश मोरे 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कंत्राटी वायरमेन राजेश मोरे यांना एका वीज ग्राहकाकडून 30 रुपयांची लाच स्वीकारताना पालघर पोलीस उपाधीक्षक हर्षल चव्हाण यांनी बुधवारी रंगेहात अटक करून त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

(27) वर्षीय तक्रारदार यांचा विकास नगर खारे कुरण पालघर येथे कोलंबी प्रकल्प आहे. या प्रकल्पाकरिता कोलंबी प्रकल्पाचे मालक यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीची वीज जोडणी घेतली आहे. या प्रकल्पाकरिता आवश्यकतेपेक्षा कमी विजेचे वोल्टेज मिळत आहे. या वोल्टेजची कमतरता पूर्ण करण्यासाठी खारे कुरण गावात बसवलेल्या ट्रांसफार्मरचा फायदा कोलंबी प्रकल्पाच्या मालकाला करून देतो या बदल्यात मला 30 हजार रुपये देण्यात यावे व तुम्ही असे न केल्यास या ट्रांसफार्मर वरील व्होल्टेज मी इतरस्त फिरवून शकतो अशी धमकी देऊन या कोलंबी प्रकल्पाच्या मालकाकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी राजेश चंद्रकांत मोरे ( वायरमन ) यांनी केली होती.

याबाबत कोलंबी प्रकल्पाच्या मालकाने या वायरमनची तक्रार पालघर अँटीकरप्शन विभागात केली होती.
याबाब पालघर अँटीकरप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी पडताळणी करून पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अँटी करप्शन (ठाणे परिक्षेत्र ), अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे अँटी करप्शन (ठाणे परिक्षेत्र ),अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अँटी करप्शन (ठाणे परिक्षेत्र ) यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी सापळा रचून वायरमन राजेश मोरे यांना तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही यशस्वी कारवाई पालघर अँटी करप्शन विभाग पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोये, पोलीस अंमलदार आकाश लोहरे यांनी केली आहे.



