फडणवीस ते मोहिते पाटील व्हाया नरेंद्र मोदी…

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
एखाद्याने आपल्या आयुष्यात जर उपकार केले तर आपण त्या व्यक्ती ला सर्वोच्च ठिकाणी मान देत असतो,असेच काही उपकार रामभाऊ सातपुते यांचे वर विजयसिंह मोहिते पाटील यांचे आणि त्यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहेत,साधारण पाच वर्षा पूर्वी राम सातपुते या नावाला काही हि वलय नसताना फक्त पक्ष श्रेष्ठी नी सांगितल्याने तमाम “शिवरत्न” धारकांनी जीवाचे रान करून राम सातपुते यांना विजय केले,हे सत्य नाकारून चालत नाही…
आता राम सातपुते यांना सोलापूर लोकसभे ची उमेदवारी जाहीर झालेली आहे,आनंद आहे…परंतु राम सातपुते यांना उपकाराची परतफेड करायची संधी चालुन आलेली आहे,सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट,मंगळवेढा,मोहोळ,पंढरपूर,शहर मध्य,शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात मोहिते पाटील यांना मानणारा एक मोठा गट राजकारणात कार्यरत असुन राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदार संघात हि मोहिते पाटील गटाची ताकत बरोबर घेणे हे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे…

आणि हो सोलापूर लोकसभा मतदार संघ हा बहुभाषिक मतदार संघ असुन या ठिकाणी राम सातपुते यांनी सावध भूमिकेत रहावे,याचे कारण असे की गेली दहा वर्षे केंद्रात मोदी ची सत्ता असुन देखील विकासापासून वंचित राहिलेला मतदार संघ म्हणुन हि सोलापूर ची ओळख निर्माण झाली आहे…
राम सातपुते यांना या मतदार संघात मागील दहा वर्षाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे आव्हान असणार आहे,हे हि नाकारून चालत नाही आणि विकास न झाल्याने बिथरलेल्या जनतेच्या रोषाला सामोरे जाणे हे आणखी वेगळेच…
तरी सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका आदेशाने निवडून दिलेल्या आमच्या आमदार राम सातपुते यांना शुभेछा…



