टाईम्स 9 मराठीचे संपादक नौशाद मुलाणी सह पत्नीक यांच्या हस्ते शिवराणा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची आरती संपन्न.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
गणपती उत्सव हा समाजात एकी निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात सुरू करण्यात आला. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी शिवराणा गणेशोत्सव मंडळ महाळूंग रोड अकलूज या मंडळाने गणपती आरती चे मान टाईम्स 9 मराठीचे मुख्य संपादक नौशाद मुलाणी सह पत्नीक यांना दिले.

मंडळाच्या या हिंदू मुस्लिम एकीच्या उपक्रमाने सर्व स्तरातून कौतुक होत आहे धार्मिक आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अखंडपणे प्रयत्न करणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणाऱ्या पत्रकाराच्या हस्ते सह पत्नीक “गणपती बाप्पाची आरती” मंगळवार (दि. 26) संध्याकाळी सात वाजता करण्यात आली.या सामाजिक सलोख्याच्या आरतीमध्ये शिवराणा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी शिवराणा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश पवार उपाध्यक्ष संतोष पवार खजिनदार प्रथमेश पवार विजय पवार, रुपेश पवार, रोहन सावंत, आर्यन सावंत, सार्थक मोरे, सागर सावंत, यश पवार, आर्यन चव्हाण, आर्यन धाईंजे, गणेश साळुंखे, मच्छिंद्र पवार, रामभाऊ पवार, फरहान मुलाणी, रेहान मुलाणी, शमशुद्दीन मुलाणी, शितल पवार, सुरेखा पवार, दिपाली चव्हाण, अनिता चव्हाण, रवीना सावंत, यांच्यासह मुस्लिम बांधव व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



