पालघर जिल्हा पोलिसांकडून राबवल्या जाणाऱ्या सायबर गुन्हे मुक्त गाव अभियानामध्ये मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियाना अंतर्गत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण पालघर जिल्ह्यात सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे.

या अनुषंगाने सफाळे पोलीस ठाणे यांच्या वतीने 29 आणि 30 जानेवारी 2025 रोजी सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील त्रिमूर्ती विद्यालय माकणे व पारगाव माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना सायबर क्राईम आर्थिक गुन्ह्याचे प्रकार , अनधिकृत खोट्या कंपन्याकडून देण्यात येणारी प्रलोभने व होणारी फसवणूक, ऑनलाइन नोकरी जाहिरात फसवणूक, लैंगिक फसवणूक, केवायसी फसवणूक, डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड यांच्यापासून सावधता कशी घ्यावी

तसेच रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता व वाहतुकीचे नियम, व स्पर्धा परीक्षा याबाबत सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी मार्गदर्शन व माहिती देऊन सायबर फ्रॉड झाल्यावर सायबर हेल्पलाइन नंबर 1930 या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी आवाहन केले यावेळी या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
