धाराशिव येथील भाजपच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षसह अनेक महिला सदस्यांनी मकरंद निंबाळकर यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
भाजपाच्या महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षांसह असंख्य महिलांनी शिवसेना ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात जाहीर प्रवेश केला आहे

धाराशिव येथील भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुवर्णाताई आचार्य यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई घोडके, तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई पांचाळ, तेसाबाई बोरूरे, अनिता अरगडे, सुशिला गंवडी, अनुराधा गवंडी यांच्यासह शेकडो महिलांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश असुन माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांचे शिवसेना पक्षघात त्यांचा सत़्कार करून स्वागत करण्यात आले
महिलांच्या समस्या सोडवत पक्ष संघटनेची मोट आणखी सक्षम मजबूत करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या

याप्रसंगी माजी गटनेते सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, रवि कोरे आळणीकर, अमित उंबरे, दिनेश बंडगर, संकेत सूर्यवंशी, शरीफ शेख, महेश उपासे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.



