महाराष्ट्र

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे कुंभमेळाव्यात आज सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.दोन दिवसांपूर्वी ते मित्रांसमवेत प्रयागराज ला गेले होते…

आज सकाळी अंघोळ करताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले.त्यांचा मृतदेह विमानाने सोलापुरात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मृत्यू समयी ते 59 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हा मुलगा,दोन मुली असा परिवार आहे…

शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होत.या दुःखद घटनेमुळे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते शहर उत्तर मतदार संघातून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते.त्यांच्या निधनाबद्दल सोलापूर शहरातील अनेकांनी शोक व्यक्त केला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button