महाराष्ट्र विधान परिषदेची रचना आणि त्याची निवडणुक प्रक्रिया…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
मित्रांनो,भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171/1 मध्ये विधान परिषदे बाबत तरतुदी ची माहिती देण्यात आली असून केंद्रीय मंत्री मंडळाच्या राजकारणामध्ये जसे राज्यसभेला “वरिष्ठ्य सभागृह” मानले जाते अगदी तसेच राज्याच्या राजकारणा मध्ये “विधान परिषदे” ला वरिष्ठ्य सभागृह मानले जाते परंतु विधानसभेच्या मानाने विधान परिषदे कडे तसे कमी अधिकार असतात…
प्रत्येक राज्याची विधानसभा जशी दर पाच वर्षांनी विसर्जित होते तशी विधान परिषद हि विसर्जित होत नसते तर दर दोन वर्षांनी विधान परिषदे तील एकूण सदस्या पैकी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात…
भारतीय संविधाना च्या तरतुदी नुसार प्रत्येक विधान परिषदे ची सदस्य संख्या हि कमीत कमी 40 असावी किंवा संबंधित राज्याच्या एकूण विधान सभा सदस्या पैकी 1/3 इतकी असावी…
महाराष्ट्र विधान परिषदेची सध्याची सदस्य संख्या हि 78 असुन विधान सभेच्या 288 सदस्य संख्येचा विचार केल्यास 1/3 च्या तुलने नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या हि 96 असायला काहीच हरकत नाही तरीही आज पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज हे 78 सदस्या मार्फत चालवले जाते…असो…
विधान परिषदेचे सदस्य खालील प्रमाणे निवडले जातात…
1) विधान परिषदेतील 30 सदस्य हे विधानसभा सदस्या मार्फत निवडले जातात…
2) विधान परिषदेतील 22 सदस्यांची निवड हि विविध स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत केली जाते…
3) विधान परिषदेतील 07 सदस्य हे पदवीधर मतदार संघातुन निवडले जातात…
4) विधान परिषदेतील आणखी 07 सदस्य हे शिक्षक मतदार संघातुन निवडले जातात…
5) आणि राहिलेले 12 विधान परिषद सदस्य हे राज्यपालांनी नियुक्त केलेले असतात…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतायेत,टाइम्स 9 न्यूज या संबंधी लवकरच जिल्हा परीषद,पंचायत समिती,महानगर पालिका,नगर परिषद,नगर पंचायत निवडणुकीचा आढावा घेणार असुन आपल्या भागातील निवडणुकीचा अप टू डेट माहिती घेण्यासाठी आजच टाइम्स 9 मराठी न्यूज च्या चॅनल ला लाईक करा,सबस्क्राइब करा आणि शेअर करा…