औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा आणि विक्रमगड येथे उद्योजकता जागरूकता कार्यक्रम संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
वाडा आणि विक्रमगड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांकरिता लघु मध्यम उद्योग (MSME) विभागाच्या मार्फत उद्योजकता जागरूकता कार्यक्रम गुरुवार दिनांक १६/०२/२०२३ रोजी घेण्यात आला.
या कार्यक्रमात एमएसएमई विभागाचे सहाय्यक संचालक श्रीपंख पाटील यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
उद्योगाची आवश्यकता उद्योगाची लोकाभिमुखता आणि उद्योगाची नफा देण्याची क्षमता अशा बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. नोकरी करण्यापेक्षा स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास आपल्याला आपल्या मर्जीचे मालक बनता येते. तथापि नोकरीची वेळ ही काही तासांची असते परंतु उद्योजक हा आपल्या ग्राहकाला कायम सेवा देत असतो. कार्यालयीन वेळेचा विचार उद्योजक करत नसतो. हे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.

तसेच शासनामार्फत उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता उपलब्ध असलेल्या योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उद्योग म्हटलं की प्रत्येक वेळेस खूप मोठे भांडवल आवश्यक असतेच असे नसून अत्यंत कमी भांडवलावरती ही नफा देणारे उद्योग उभे राहू शकतात फक्त कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे हेही पाटील यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमातून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना अत्यंत उत्साह प्राप्त झाला असून प्रशिक्षणाचा उपयोग उद्योग सुरू करण्याकरता कसा करता येईल याबाबत मुलांचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे.असे संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे यांनी सांगितले.