अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन,मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला.अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते.पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती…
अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती.पण आज त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे.त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे…
अतुल परचुरे यांचा जन्म ३० नोव्हेंबर रोजी मुंबई मध्येच झाला होता.त्यांनी बालकलाकार म्हणून हि काम केले,त्यांनी चित्रपट,दूरदर्शन मालिका आणि रंगमंचावर काम केले.ते प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जात असत…
त्यांनी विविध अभिनेत्यांसोबत काम केले आणि सहाय्यक भूमिका साकारताना दिसले.नवरा माझा नवसाचा,सलाम-ए-इश्क,पार्टनर,ऑल द बेस्ट,फन बिगिन्स,खट्टा मीठा,बुध्दा होगा तेरा बाप आणि ब्रेव्ह हार्ट या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले…
मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते,त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या…



