शहर

बागवान जमातीच्या 2025 कॅलेंडर चे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडले…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्युज,अकलूज
9890299499

पुणे येथील बागवान समाज सेवा संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन “संसदरत्न” खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे एका भव्य समारंभात कऱण्यात आले

पुणे येथील बागवान समाज सेवा संस्था हि सातत्याने समाज हिताच्या प्रश्नांचा पाठपुरावा करत असते,पुणे येथील बागवान समाज सेवा संस्थेच्या अंतर्गत सबंध महाराष्ट्रात “रिश्ते नाते” या व्हॉट्स ॲप च्या ग्रुप च्या माध्यमातुन बागवान समाजाला जोडण्याचे काम हि सदरची संस्था जोमाने करत असल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

बागवान समाज सेवा संस्था ने अनेक समाज उपयोगी कामावर भर दिल्याचे आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी कॅलेंडर चे प्रकाशन केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी बागवान समाज सेवा संस्थेचे कौतुक केले…

या वेळी पुणे येथील बागबान समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष जावेदभाई बागवान,उपाध्यक्ष असगरभाई बागवान,खजिनदार साजिदभाई बागवान,कार्याध्यक्ष युसुफभाई बागवान,जुबेर मर्चंट,रफिकभाई बागवान,अतिकभाई बागवान,शफी मामा यांच्या सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button