शहर

ठाणे वागळे इस्टेट आरटीओ एजंट लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक पल्लवी(ढगे)पाटील यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत ..


दुचाकी लर्निंग लायसन्स काढून देण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी व तिचा स्वीकार केल्याप्रकरणी वागळे इस्टेट ठाणे आरटीओ एजंट कामरान शेख याला गुरुवारी संध्याकाळी अँटी करप्शन ब्युरो ठाणे पोलीस निरीक्षक पल्लवी (ढगे)पाटील यांच्या पथकाने रंगेहात अटक करून त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट ठाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


दुचाकी लायसन्स काढण्यासाठी शासकीय फी 201 रुपये असताना दुचाकी लायसन्स काढण्यासाठी आलेले इसम (तक्रारदार ) यांच्याकडे ठाणे वागळे इस्टेट येथील आरटीओ एजंट कामरान फैजुद्दीन शेख वय वर्ष(49) यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून अंतिम 2800 रुपये लागतील असे तक्रारदार यांना सांगितल्यावर

तक्रारदार यांनी या आरटीओ एजंटची लेखी तक्रार ठाणे अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात केल्यावर या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्री.सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनिल घेरडीकर ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो ठाणे युनिट पोलीस निरीक्षक पल्लवी (ढगे)पाटील यांच्या पथकाने गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजता सापळा रचून कामरान शेख याला तक्रारदार यांच्याकडून 1300 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्याच्या विरुद्ध ठाणे शहर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button