रक्षाबंधनासाठी आपल्या बायकोला माहेरी सोडून घरी परत येत असताना डहाणू कासा निकणे येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640
रक्षाबंधनासाठी आपल्या भावाकडे जाण्यासाठी निघालेल्या बायकोला माहेरी सोडून परत घरी येत असताना एका (31) वर्षीय तरुणाची मोटर सायकल रस्त्यातील खड्ड्यात आदलून त्यांनी समोरील इलेक्ट्रिक पोलला जबरी ठोकर दिल्यामुळे या मोटर सायकल स्वाराचा डहाणू येथील आशागड संतोषी माता मंदिरासमोरील रोडवर अपघात होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना डहाणू पोलीस ठाणे हद्दीत रविवारी संध्याकाळी 6:00 वाजता घडली आहे.कासा पोलिस ठाणे हद्दीत निकणे गावात राहणारा (31) वर्षीय अविनाश भिवा सगणे सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 00.6 वाजता आपल्या बायकोला घेऊन रक्षाबंधन करण्यासाठी तिचा भाऊ राहत असलेल्या जामशेत पारसपाडा येथे आपली मोटरसायकल घेऊन गेला होता.
तो आपल्या बायकोला सोडून त्याच्या निकणे येथील घरी परत येत असताना संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या काळया रंगाची मोटर सायकल संतोषी माता मंदिरासमोर असलेल्या रोडवरील खड्ड्यात आदळल्यामुळे त्याची मोटर सायकल इलेक्ट्रिक पोलवर जाऊन जबरी ठोकल्यामुळे त्याला दुखापत होऊन त्याला उपचारासाठी नेत असताना प्रवासामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.



