फिल्मी स्टाईलने पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागाने केला 10 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागातील भरारी टीमने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तलासरी पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या वाहनांचा तपासणीत एका कारमध्ये विदेशी दारूचा साडेतीन लाख रुपयांचा मद्याचा साठा आणि कार असा एकूण 10 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य मद्याची वाहतूक साठा व विक्री प्रकरणी पालघर जिल्ह्यात सक्त कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम राबवत असताना तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ठाकरपाडा रोड कुर्जे डॅम जवळ बुधवार दिनांक 13 नोवेंबर 2024 रोजी अवैद्य मद्य वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क पालघर विभागाला प्राप्त झाली होती.
या अनुषंगाने त्यांनी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली असताना तलासरी येथे दादरा नगर हवेली पासिंग असलेली DN 09- Q 00473 या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची शिफ्ट मारुती कार पोलिसांना बघून सुसाट वेगाने जात असताना पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ही कार ताब्यात घेऊन या कार मधील विदेशी मद्याच्या साडेतीन लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या व कार असा एकूण 10 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, आणि राज्य उत्पादन शुल्क पालघर विभाग सुधाकर कदम, बी.एन भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस निरीक्षक सुनील देशमुख, दुय्यम निरीक्षक ए.एस. चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विकास आबनावे, विश्वजीत आभाळे, ए एम शेख, कमलेश पेंदाम या पथकाने केली आहे.