आंतरराष्ट्रीय विश्व कराटे स्पर्धेत वसई येथील सिया मेहर हिने गोल्ड मेडल तर शान मेहर यांनी जिंकले सिल्वर मेडल
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत वसई तालुक्यातील नालासोपारा कळंब गाव येथील कुमारी सिया राणी स्वप्नील मेहर वय वर्ष (12 ) व कुमार शान राणी स्वप्नील मेहर वय वर्ष ( 7) यांनी गोल्ड व सिल्वर मेडल जिंकून वसई तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्यामुळे तालुक्यातील क्रीडा रसिकांमध्ये नवा जोश निर्माण होऊन उत्साह साजरा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय 24 वी FSKA विश्व कराटे चॅम्पियन स्पर्धा पेड्डम मापुसा गोवा येथे गुरुवार दिनांक 7 ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील वसई तालुक्यामधील नालासोपारा कळंब येथील कुमारी सिया राणी स्वप्नील मेहर हिने गोल्ड व ब्रांझ मेडल जिंकले आहे.तर कुमार शान राणी स्वप्निल मेहेर याने सिल्वर आणि ब्रांझ मेडल जिंकून वसई तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर रोशन केले आहे.
या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जपान, केनिया, स्पेन, इटली अशा 64 देशातील कराटे मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये वसई नासोपारा कलंब येथील गोल्ड व ब्रांझ मेडल जिंकणाऱ्या कुमारी सिया राणी स्वप्नील मेहर व ब्रांझ मेडल जिंकणाऱ्या कुमार शान राणी स्वप्निल मेहर यांना प्रख्यात ग्रँड मास्टर हंशी केवीन फुनाकोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.