साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त माळशिरस शहरामध्ये व परिसरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम

माळशिरस तालुका प्रतिनिधी. महेश मोहिते मो.नं :8380848673
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजू गोरगरीब मुलांना शालेय साहित्य व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम व खाऊवाटप करण्यात आले यानंतर माळशिरस शहरातील विविध शाळांना भेट देऊन त्या शाळेंना शालेय साहित्य वाटप व पर्यावरणाचा विचार करून प्रत्येकी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगून वृक्ष वाटप व वृक्ष रोपण करण्यात आले….

सदर कार्यक्रम हा महादेव भाऊ तुपसौंदर, यांच्या मार्गदर्शनाखाली व जयंती समितीच्या वतीने करण्यात आला…

यावेळी प्रमुख उपस्थिती माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार साहेब व तुळजाभवानी बँकेचे चेअरमन अमोल भाऊ पवार व संग्राम दादा पाटील व अशोक तुपसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित किशोर तुपसौंदर ,विशाल तुपसौंदर ,संग्राम लांडगे,पोपट तुपसौंदर,महेश मिसाळ ,दिलीप मदने, राजाभाऊ मिसाळ ,नितीन तुपसौंदर,आयुष तुपसौंदर,सुभाष देवकते,व लहू कन्या दिपाली नाईक नवरे व इतर मान्यवर उपस्थित होते





