सपना इलेक्ट्रॉनिक्स 14 लाख 60 हजार रुपयांच्या चोरी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकाला यश
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640
सफाळे येथील सपना इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडाऊन मधून 14 लाख 60 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करून फरार झालेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के. शेळके यांच्या पथकाला सोमवारी यश आले आहे.
सफाळे पूर्व येथील सपना इलेक्ट्रॉनिकचे मालक दिनेश जैन यांच्या सपना इलेक्ट्रॉनिकच्या पाठीमागील बाजूला असलेल्या बंद गोडाऊन मधून बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर 2024 पहाटेच्या सुमारास 14 लाख 60 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही चोरी करून अज्ञात चोर फरार झाले होते.यापैकी दोन चोरांना संपूर्ण मुद्देमालासह भिवंडी येथून सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी अटक करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, आणि पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के.शेळके, हवालदार कल्पेश केनी, हवालदार वैभव सातपुते, हवालदार किसन बांगर, हवालदार शिवाजी चीमकर या पथकाने केली आहे.