राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ.सुनिल सुखदेव लोखंडे यांच्या हस्ते जय मल्हार हॉटेलचे उदघाटन
प्रतिनिधी:महेश मोहिते मोबाईल. 80 83 84 86 73
राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस विधानसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ.सुनिल सुखदेव लोखंडे यांच्या हस्ते जय मल्हार हॉटेलचे उदघाटन संपन्न झाले
त्याप्रसंगी हॉटेल मालक महेश साठे त्यांचे वडील शंकर साठे चुलते शिवाजी साठे मुख्याध्यापक कुंडलिक साठे सर्वच साठे परिवार बहुसंख्येने उपस्थित होते तसेच तालुक्यातील विविध गावांमधून आलेले नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान प्रा.डॉ.सुनिल लोखंडे यांनी साठे कुटुंबीयांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास सांगून आजतरुणांना व्यवसायाची कशी गरज आहे हे सांगितलेव आपला व्यवसाय प्रामाणिकपणे केल्यास नक्की यश येते असे सांगितले व नूतन व्यवसायामध्ये यश येवो अशी सदिच्छा व्यक्त करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी श्री. लिंगे व श्री. काळे यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली तर श्री.मगर यांनी आलेल्या प्रतिष्ठितांचे स्वागत केले व श्री. कुंडलिक साठे यांनी आभार मानले त्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम होऊन उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर परत येताना माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा.डॉ.सुनिल लोखंडे यांनी दोन गावांमध्ये थांबून बैठक घेतली व आपली भूमिका समजाऊन सांगितली त्यावर लोकानी काही प्रश्न विचारले तेंव्हा त्यांचे समाधान होईपर्यंत उत्तरे दिली नंतर खेळीमेळीच्या वातावरणात फोटो काढले व त्यांचा निरोप घेतला…