येत्या २८मे रोजी शिर्डी इथे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या महा अधिवेशनाला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित रहाणार असल्याने राजकीय समीकरणाकडे सगळ्यांचे लक्ष

बी टी शिवशरण
येत्या २८मे ला शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाआठवले गटाचे महा अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आमंत्रित केले आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाची ताकद व एकत्रिकरण याचे राजकीय गणित मांडण्यात येणार आहे
आजपर्यंत रामदास आठवले यांचा गट ज्यांचे सोबत त्या पक्ष्याला सत्ता हे समीकरण झाले आहे मधल्या काळात शिवसेना शिंदे गट व भाजपा यांचे मनोमिलन होऊन त्यांनी सरकार बनवले आहे सामाजिक राजकीय उलथा पालथ झाल्याने महाराष्ट्रात राजकीय गणित अवघड होऊन बसले आहे या सर्व पार्शवभूमीवर भाजप आणि आठवले गट यांची युती आहे युती आहे पण भाजपने आठवले गटाला सत्तेतील वाटा दिलेला नाही कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये सत्तेत सहभागी करुन घेतलेले नाही
या व अनेक काही मुद्यावर राजकीय घडामोडी वाटाघाटी चर्चा संवाद अपेक्षित आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आठवले यांच्या पक्ष व कार्यकर्त्यांना काय देऊ इच्छितात काय आश्वासन देतात याचा लेखाजोखा या महाअधिवेशन मध्ये कार्यकर्त्यांना मिळणार आहे महा अधिवेशन तयारी जोरात सुरु आहे जिल्हा तालुका राज्यस्तरीय गावापातळीवर बैठका नियोजन तयारी सुरु आहे रामदास आठवले यांची सामाजिक राजकीय ताकद मोठी आहे आठवले यांना मानणारा मोठा चाहाता वर्ग सर्व राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या पक्षात आहेत
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी पक्ष वाढीसाठी राज्यभर अभियान राबवले आहे कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानेसंपूर्ण राज्यभर क्रियाशील सभासद नोंदणी सुरु आहे पक्षाच्या नवीन धोरणानुसार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन नियम अटी समजावून सांगितल्या जात आहेत राजाभाऊ सरवदे हे रामदास आठवले यांचे अत्यंत जवळचे विश्वासूं कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात
सरवदे यांनी प्रदेशाध्यक्ष पद घेतल्यापासून लोणावळा भुसावळ येथे पक्षाचे अधिवेशन झाली आहेत ती अधिवेशनसुरळीत पार पाडण्यात सरवदे यांचे योगदान मोठे आहे एकीकडे उन्हाचा चटका तर दुसरीकडे राजकीय तापमान वाढवणारे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे महा अधिवेशन होत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय हवा कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे



