महाराष्ट्र

पवारांनी फिरवली भाकरी,युगेंद्र पवारांच्या नावासह 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील नावे जाहीर केली.बारामतीमध्ये पवारांनी भाकरी फिरवत युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी

  1. इस्लामपूर- जयंत पाटील
  2. काटोल- अनिल देशमुख
  3. घनसावंगी- राजेश टोपे
  4. कराड उत्तर- बाळासाहेब पाटील
  5. मुंब्रा-कळवा- जितेंद्र आव्हाड
  6. कोरेगाव- शशिकांत शिंदे
  7. वसमत, हिंगोली- जयप्रकाश दांडेगावकर
  8. जळगाव ग्रामीण- गुलाबराव देवकर
  9. इंदापूर- हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी- प्राजक्त तनपुरे
  11. शिरूर- अशोकराव पवार
  12. शिराळा- मानसिंगराव नाईक
  13. विक्रमगड- सुनील भुसारा
  14. कर्जत-जामखेड- रोहित पवार
  15. अहमदपूर- विनायकराव पाटील
  16. सिंदखेडराजा- डॉ. राजेंद्र शिंगणे
  17. उदगीर- सुधाकर भालेराव
  18. भोकरदन- चंद्रकांत दानवे
  19. तुमसर- चरण वाघमारे
  20. किनवट- प्रदीप नाईक
  21. जिंतूर- विजय भांबळे
  22. केज- पृथ्वीराज साठे
  23. बेलापूर- संदीप नाईक
  24. वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे
  25. जामनेर- दिलीप खोडके
  26. मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
  27. मूर्तिजापूर- सम्राट डोंगरदिवे
  28. नागपूर पूर्व- दिनेश्वर पेठे
  29. शिरोळा- रविकांत गोपचे
  30. अहेरी- भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर- रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
  32. मुरबाड- सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व- राखी जाधव
  34. आंबेगाव- देवदत्त निकम
  35. बारामती- युगेंद्र पवार
  36. कोपरगाव- संदीप वरपे
  37. शेवगाव- प्रताप ढाकणे
  38. पारनेर- राणी लंके
  39. आष्टी- मेहबूब शेख
  40. करमाळा- नारायण आबा पाटील
  41. सोलापूर शहर उत्तर- महेश कोठे
  42. चिपळूण- प्रशांत यादव
  43. कागल- समरजित घाटगे
  44. तासगाव कवठेमहांकाळ- रोहित आर आर पाटील
  45. हडपसर- प्रशांत जगताप

शरद पवारांनी पहिल्या यादीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं दिसून येत आहे. यामध्ये प्रशांत जगताप, महेबूब शेख, युगेंद्र पवार, रोहित पाटील, राणी लंके हे चेहरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button