शहर

स्वप्नातून सत्या कडे चा प्रवास… टाइम्स 9 चे संपादक नौशाद मुलाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

माझ्या वडिलांच्या निधनानंतर सा “आधारस्तंभ” जवळ जवळ बंदच झाले होते,आम्हीं तिघे भाऊ हि “आधारस्तंभ” साठी लिहायचा प्रयत्न करायचो,पण अचानक आमचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी युसुफ मोहोळकर यांचे निधन झाले आणि सा “आधारस्तंभ” हि आमच्या सह पोरका झाला…

मी स्वतः हि काही आर्टिकल वगैरे लिहायचा प्रयत्न करायचो पण ते हि जवळ जवळ बंद केले होते,अशातच अकलूज मध्ये एक मोर्चा प्रांत अधिकारी यांच्या ऑफीस वर येऊन धडकला होता आणि तेथे बोलता बोलता मला परत एकदा लिहतं केले ते याच मित्राने…

होय,टाइम्स 9 चा संपादक नौशाद मुलाणी हा तसा पहिल्या पासुन माझा मित्र,तो त्याच्या भाऊजीचां चहा कॅन्टीन बघायचा नंतर नंतर तो स्वतः स्वावलंबी बनून रिक्षा चालक हि झाला,त्याची कहाणी म्हणजे जणु एखाद्या चित्रपटाची पटकथा च…

वाचनाची अफाट सवय,जिद्द,चिकाटी आणि काम कसले हि असो ते मेहनतीने करण्याची तयारीच नौशाद मुलाणी ला टाइम्स 9 पर्यंत घेउन आली असे म्हंटले तरी ते वावगे ठरणार नाही…

आज नौशाद मुलाणी टाइम्स 9 न्यूज नेटवर्क चा संपादक म्हणून जो काम करत आहे त्याला तोड नाही,एके दिवशी त्याने मला टाइम्स 9 सुरु करतानाच्या आठवणी सांगितल्या त्यावेळेस मला कळले की,नौशाद मुलाणी मृदू स्वभावाचा हृदयस्पर्शी माणूस आहे…

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मला मनस्वी आनंद तर होतच आहे,परंतु टाइम्स 9 ला त्याने ज्या “बुलंदी” वर नेऊन ठेवले आहे ते वाखाणण्याजोगे आहे…

नौशाद मुलाणी बद्दल आणखी बरेच काही लिहायचे,बोलायचे आहे…आजच्या त्याच्या वाढदिवसानिमित्त टाइम्स 9 चा अकलूज शहर प्रतिनिधी म्हणून हि अनेक शुभेच्छा तर आहेच परंतु एक मित्र म्हणून हि त्याचा रोजचा दिवस वाढदिवसा सारखाच असावा अशी कायम अपेक्षा आहे…

WISH YOU HAPPY BIRTHDAY,NAUSHAD…

🌹🌹🌹💐🌹🌹🌹

अल्लाह करें तेरी उम्र दराज हो,आमीन…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button