लासुर्णे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

इंदापूर तालुका —–प्रतिनिधी मोहम्मद कैफ तांबोळी मो. 83 78 081 147
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधूध व रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार दि.३० एप्रिल २०२३ रोजी लासुर्णे येथे साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला पंचक्रोशीतील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिरास छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, लासुर्णे गावचे सरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा) लोंढे, ग्रामपंचायत सदस्य दिपक लोंढे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ, दिर्घायु हॉस्पिटलचे डॉ.राजेश कांबळे, आंबेडकरवादी चळवळीतील अजित ठोकळे, सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे, बहुजन प्रतिष्ठान चे योगेश मिसाळ, किरण मिसाळ, विजय सुतार, तसेच सुमित घोडके, विशाल भोसले, निलेश लोंढे , साजेश तोरणे, संकेश तोरणे, आफ्रोज शेख,यांनी भेटी दिल्या.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, संस्थेचे उपाध्यक्ष नागेश भोसले, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अनिल केंगार, अजय फले,सौरभ धनवडे, बबलु वंचाळे, संघटनेचे ट्रस्टी आप्पासो कदम, अक्षय फले यांनी प्रयत्न केले.




