वीट येथे केंद्रस्तरीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व स्पर्धा संपन्न
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
केंद्रप्रमुख वैशाली महाजन पंचायत समिती करमाळा शिक्षण विभाग यांचे वतीने घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा केंद्रस्तरीय वीट येथे केंद्रप्रमुख महाजन वैशाली यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली
यावेळी केंद्रातील पोंधवडी ,विहाळ, मोरवड ,अंजनडोह, वीट ,मारकड वस्ती ,गाडेवस्ती, नाळेवस्ती, जांभूळ झरा, हवलदारवाडी ,मोहोळकरवाडी या शाळांनी सहभाग घेतला. लोकनृत्य , चित्रकला ,कथाकथन, समूहगीत, निबंध ,वक्तृत्व या स्पर्धा लहान व मोठा या गटात घेण्यात आल्या. दिव्यांका जाधव – कथाकथन. अद्वैत माने – वक्तृत्व स्पर्धा. निबंध स्पर्धा – प्रथमेश जाधव. स्वानंदी बंडगर – चित्रकला स्पर्धा. समूहगीत गायन – नाळे वस्ती. समूह नृत्य स्पर्धा – पोंधवडी शाळा. मोठा गट निबंध स्पर्धा -सायली मासाळ. समूहगीत गायन :- पोंधवडी शाळा समूह नृत्य स्पर्धा ;-अंजनडोह शाळा या सर्वांचा प्रथम क्रमांक आलेला आहे सर्व स्पर्धकांना केंद्रप्रमुख वैशाली महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.
यावेळी परीक्षक म्हणून चंद्रहास चोरमले ,हनुमंत सरडे ,अमीन सय्यद ,संतोष पोतदार, सुजाता अनारसे, हनुमंत जाधव, विषय तज्ञ जाधव डी डी , राम म्हेत्रे, सुंदरदास पाडूळे ,सतीश कांबळे, स्वाती डमरे ,मनोज जाधव ,भारती जंजिरे ,सोमनाथ पाटील ,अर्जुन ढेरे, जनार्धन घाडगे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सर्व यशस्वी संघाचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे , विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले ,केंद्रप्रमुख महाजन वैशाली यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.