प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी मातोश्री वृद्धाश्रमात केला मुलाचा वाढदिवस साजरा.
करमाळा (प्रतिनिधी ) -अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
वाढदिवस म्हटले की केक आलाच त्यातच खर्चिक बाब आली या सर्व खर्चिक गोष्टीला फाटा देत रावगाव येथील मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी आपल्या चिरंजीवाचा वाढदिवस पांडे तालुका करमाळा येथील वृद्धाश्रमामध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक वेगळे आदर्श ठेवले आहे
रामदास कांबळे यांचे चिरंजीव राजरत्न याचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रम पांडे या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी आश्रमातील आजी -आजोबांना फळे व बिस्किट यांचे वाटप करण्यात आले यावेळी कांबळे बोलताना म्हणाले की आज काल वाढदिवसाची व्याख्या म्हणजे भला मोठा केक, साऊंड सिस्टिम, या गोष्टी वाढदिवसामध्ये अंतर्भूत असतात
परंतु या गोष्टी न करता कुठेतरी आपण समाजाचे देणं लागतो व येणाऱ्या पिढीला या गोष्टीचं भान असावं यासाठी कुठेतरी आपण या आजी आजोबांबरोबर किंवा अशा संस्थांबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज उपयोगी कार्य करणे गरजेचे आहे असे कांबळे म्हणाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोरे सौ. मीना बाळासाहेब गोरे व आश्रमातील आजी – आजोबा उपस्थित होते.