कमलाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची विक्रमी गर्दी!
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
!करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या श्री देवीचामाळ येथील कमलाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त आलेल्या सप्तमीला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती आज सप्तमी असल्यामुळे भाविकांचे लोंढेचे लोंढे मंदिराकडे दर्शनासाठी येत होते आज सकाळी कमला भवानीची महापूजा भरजरी शालू व वस्त्रालंकार घालून ओंकार पुजारी यांनी मांडली या महापूजा वेळी सर्व पुजारी मानकरी उपस्थित होते
या वेळेला कमला भवानीच्या मूर्ती भोवती माहि डेकोरेशन करमाळा यांनी निळ्या फुलांचे गुंफण करून आकर्षक आरास मांडली आजचा रंग निळा असल्यामुळे निळ्या रंगाच्या भरदरीशाळू तसेच निल्या निळ्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती आज दिवसभर अण्णछत्रामार्फत फराळाच्या पदार्थाची वाटप चालू होती तसेच मनोरंजनासाठी आणला असलेले खेळ दिवसभर चालू होते