जिल्हा मल्लखांब स्पर्धेत जेऊरची भारत प्रशाला ठरली विजेती
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी जेऊर तालुका करमाळा येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा झाल्या. या स्पर्धा एकूण सहा गटात संपन्न झाल्या पैकी पाच गटात भारत हायस्कूल जेऊर चे खेळाडू विजयी झाले असून त्यांची पुणे विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडू पुढीप्रमाणे मुली 14 वर्ष आतील कुमारी पावनी सलगर प्रथम क्रमांक श्रुती माने तृतीय क्रमांक
17 वर्ष आतील मुली समृद्धी कुलकर्णी प्रथम क्रमांक वैभवी निमगिरी द्वितीय क्रमांक 19 वर्ष आतील मुली श्रावणी कांडेकर प्रथम क्रमांक मुले 14 वर्ष आतील श्रीहरी माने द्वितीय क्रमांक विराज बादल तृतीय क्रमांक शंभूराजे इंगोले पाचवा क्रमांक मुले 17वर्ष आतील सुमित सरक प्रथम क्रमांक मेघराज गायकवाड चतुर्थ क्रमांक. वरील सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमारे सर आणि बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील उपाध्यक्ष प्रा. राजूशेठ गादिया जेऊर चे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील सचिव प्रा. अर्जुनराव सरक सर प्राचार्य आबासाहेब सरोदे उपप्राचार्य नागेश कांबळे सर पर्यवेक्षक बी. एस. शिंदे सर सर्व संस्था सदस्य जेऊर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.