पालघर जिल्ह्यातील सफाळे आगरवाडी येथील आधारकार्ड सेंटर तीन महिन्यापासून बंद
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे आगरवाडी येथील आधारसेंटर गेल्या तीन महिन्यापासून बंद असून या भागातील नागरिकांना आधार दुरुस्ती तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी अडचणी येत आहेत.
महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी पी. एम. योजना किसान व विद्यार्थ्यांना त्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यास सफाळे किंवा पालघर येथे जावे लागते ते नागरिकासाठी खर्चिक व त्यासाठी वेळ वाया जात आहे.
या भागातील आधार सेंटर चालकाशी संपर्क साधला असता असे समजले की आठ ते दहा वर्षापूर्वी देण्यात आलेले आधार संच वेळोवेळी तांत्रिक कारणांमुळे बंद पडतात. याअगोदर वेळेवर आधारसंच री रजिस्टर करून मिळत होत्या. आता मात्र गेल्या दोन अडीच महिन्यापासून री रजिस्टर करून मिळत नाहीत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा जिल्हा मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला की ते री रजिस्टरसाठी अजून सह्या झाल्या नाहीत सह्या झाल्या की चालू होईल अशी उत्तरे मिळतात. परंतु प्रत्यक्षात कोणी ही लक्ष्य देत नाहीत. तरी सर्व नागरिकांचे म्हणणे आहे की या कडे स्वतः जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष्य देऊन आगरवाडी येथील आधारकेंद्र लवकरात लवकर री रजिस्टर करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.