महाराष्ट्र

कंदर-केम-रोपळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी हॅम योजने अंतर्गत निधी मंजुर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आदेश.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश.

करमाळा प्रतिनीधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

रोपळे-केम-कंदर या रस्त्याची एकुण लांबी २५ कि.मी असुन त्याच्या विकासासाठी रेल्वेच्या सेंट्रल मार्गावर केम येथे उड्डाण पुल उभारण्याची अत्यंत गरज आहे.सदर मार्गाचे व उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात आले असुन.रोपळे -केम -कंदर या रस्त्याचे ३० फुटापर्यंत रुंदीकरण करणे अपेक्षित आहे.त्यासाठी ४० कोटी रुपये व उड्डाणपुलासाठी ३५ कोटी रुपये अशा एकुण ७५ कोटी रुपये एवढ्या मोठ्या निधीची गरज आहे.त्यासाठी हायब्रीड अन्युईटी मोड (HAM) योजनेअंतर्गत निधी उपलब्द होऊ शकतो.त्या अनुषंगाने रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन चर्चा केली होती व तसे पत्र दिले होते.त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हा रस्ता हायब्रीड अॅन्युईटी मोड (HAM) योजने अंतर्गत मंजुर करण्यासाठी आदेश दिले आहेत.

केम हे देशातील कुंकु उत्पादनाचे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र आहे.केममध्ये सुमारे ४२ कुंकांचे कारखाने असुन देशातील व महाराष्ट्रातील सर्व मोठ्या मंदिरांना येथुन कुंकवाचा पुरवठा होत असतो.केम येथे चार प्रमुख जिल्हा मार्ग एकत्रित येतात.या परिसरातील कृषी उत्पादने केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक बाजारपेठेत जात असतात.तसेच या रस्त्याच्या माध्यमातुन अनेक साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा होत असतो.तसेच या परिसरातील २५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या दृष्टीने संबधित मार्ग महत्वाचा आहे.

सद्यस्थितीत या भागांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नाही.त्यादृष्टीने या भागाचे नेते अजित तळेकर यांनी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.नुकतीच त्यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे समवेत देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती.यावेळी कंदर येथील आ.मोहिते पाटील यांचे सहकारी ज्ञानेश पवार ही उपस्थित होते.त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असुन संबधित रस्त्यासाठी आ.मोहिते पाटील यांच्या कौशल्यातुन हॅम योजनेअंतर्गत मंजुरी मिळणार असल्याने या भागातील नागरिकांनी आमदार मोहिते पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
08:28