एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून तुळजापूर येथे घटस्थापने दिवशी पोलीस मित्र म्हणून बंदोबस्त देण्यात आला

प्रतिनिधी महेश मोहिते
एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था गेल्या अनेक वर्षभरात अनेक विविध उपक्रम राबवत आहे त्यामध्ये प्रामुख्याने या संस्थेकडून पोलीस मित्र म्हणून काम करण्याचा योग नेहमी येतो. या संस्थेकडून 2024 च्या घटस्थापने दिवशी श्रीक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी बंदोबस्त देण्यात आला. श्रीक्षेत्र तुळजापूर येथे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी ज्योत नेणाऱ्या भाविकांची खूप गर्दी होते.

या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाला ही खूप मनुष्यबळाची आवश्यकता असते. आणि या सामाजिक संस्थेचे उद्दिष्टच हे आहे ज्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता असते त्या ठिकाणी ही संस्था तत्परतेने उपलब्ध राहते. ज्योतीच्या दिवशी या संस्थेने तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज येथे ज्योत मुळे होणाऱ्या गर्दीला अतिशय योग्य प्रकारे हाताळून त्यांना व्यवस्थित मार्ग तयार करून दिला. यामध्ये शिवाजी चौकात ड्युटी असणारे श्री. प्रमोद भिंगारे साहेब (API), पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री महादेव राऊत साहेब तसेच ट्रॅफिक इन्चार्ज श्री केंद्रे साहेब यांनीही खूप सहकार्य व कामानंतर कौतुक केले. तसेच या संस्थेची उद्दिष्टे ऐकून तुळजापूर या ठिकाणी असलेले आयपीएस ऑफिसर श्री संजय जाधव साहेब यांनीही सर्व सभासदांचे कौतुक केलं.

या बंदोबस्तासाठी संस्थेचे अध्यक्ष संचालक श्री. नागेश जाधव उपाध्यक्ष. श्री जुबेर मुजावर, सचिव/ कार्याध्यक्ष श्री.भाग्यवंत भालेराव सदस्य श्री वैभव मस्के, श्री पवन गिरी, श्री आदित्य यादव, श्री आकाश माने श्री सुशील राठोड श्री श्रीमंत शिंदे उपस्थित होते. या संस्थेने सलग दोन वर्ष तुळजापूर वारीसाठी बंदोबस्त दिला.



