माळीनगर गावाच्या उपसरपंच पदी अतुल नवनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मो 9921500780
माळीनगर ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी अतुल नवनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच अनुपमा अनिल एकतपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसचिवालयात उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली.

उपसरपंच पदी निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी चंदू भोसले, यांनी केली यावेळी सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी मोहन शिंदे, यांनी काम पाहिले सभागृहात सरपंच ,उपसरपंच, व सर्व नूतन सदस्य, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन सरपंच यांनी गावाच्या विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली यावेळी कल्पेश पांढरे, अभिजीत वजाळे, यांनी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी हेमंत रासकर, कांतीलाल एकतपुरे, ज्ञानेश्वर थोरात, रोहिदास सोनवणे, माने, सर्व नूतन सदस्य, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



