शहर

पालघर जिल्ह्यातील आगरवाडी सपोर्ट कौशल्य विकास केंद्र येथे 23 सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क.पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.

पालघर जिल्हा पोलीस दल जनसंवाद अभियाना अंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाणे आणि पंडित दीनदयाल उपाध्याय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र पालघर तसेच सपोर्ट कौशल्य विकास केंद्र आगरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 4:00 वाजेपर्यंत सपोर्ट कौशल्य विकास केंद्र आगरवाडी (सफाळे) येथे रोजगार व उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सपोर्ट कौशल्य विकास केंद्र आगरवाडी ही सामाजिक संस्था पालघर जिल्ह्यातील आगरवाडी सफाळे भागात गेल्या 11 वर्षांपासून म्हणजे 2013 पासून कार्यरत आहे.

या संस्थेमार्फत या भागात विविध सामाजिक उपक्रम देखील या संस्थेने राबवले आहेत. या परिसरातील नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येताना बायो-डाटाच्या तीन प्रत व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी असे आवाहन सपोर्ट कौशल्य विकास केंद्र आगरवाडी आणि केळवा सागरी पोलीस ठाणे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर यांच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी – 8624047600 व 8329102237 या भ्रमणध्वनी क्रमांकावर केळवा सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button