महाराष्ट्र

अकलूज चे अश्विनी हॉस्पिटल आणि पुण्याचे संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…

🎯 खेळीमेळीच्या वातावरणात झाली पत्रकार परिषद…

🎯 पुण्याचे डॉ संचेती यांच्या सह अकलूज येथील प्रख्यात डॉक्टरांची उपस्थिती…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

इंडियन मेडिकल असोसिएशन संग्रामनगर-अकलूज,येथील अश्विनी हॉस्पिटल चे डॉ एम के इनामदार आणि पुणे येथील प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 22 सप्टेंबर २०२४ रोजी मोफत मणक्याच्या आजारावरील तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दोन्हीं हॉस्पिटल च्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली…

या शिबीरा विषयी तसेच संचेती हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवल्या जाणारे विविध उपक्रम,उपचारासाठी असलेल्या अत्याधुनिक सुविधा याबाबत ची सर्व माहिती देण्यासाठी डॉ पराग संचेती हे संवाद साधणार असल्याने आज अकलूज येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते…

यावेळी डॉ पराग संचेती,डॉ एम के इनामदार,डॉ अमोल शिंदे,डॉ संतोष खडतरे,डॉ संजय सिद,डॉ नितीन राणे,डॉ निखिल मिसाळ,डॉ शैलेश हदगावकर,डॉ विश्वास कदम आदी उपस्थित होते…

पत्रकार परिषद आटोपल्या नंतर उपस्थित सर्व प्रख्यात डॉक्टर यांच्या सह आलेल्या पत्रकारांनी चहा पाण्याचा कार्यक्रम करुन पत्रकार परिषदेची सांगता केली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button