महाराष्ट्र

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी .

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख

सकल मुस्लिम समाज करमाळा च्या वतीने 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील गणरायाच्या विसर्जन मिरवणूकी वेळी जामा मशीद करमाळा मधून पुष्पगुष्टी होणार असल्याची माहिती जामा मशीद ट्रस्टचे विश्वस्त तसेच सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर सय्यद यांनी पत्रकारांना माहिती दिली .

याबाबत सय्यद पुढे बोलताना म्हणाले आमचे प्रेरणास्थान व मुस्लिम समाजाला नवी दिशा नवा विचार देणारे माझे आदरस्थान वडील पत्रकार स्व सय्यद भाई पत्रकार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आम्ही गेली एकोचाळीस वर्षांपासून एकदाही खंड न पडता अविरत चालू आहे सदरचा मानवतेचा सलोखा शहर व तालुक्यात कायमस्वरूपी टिकून राहावा या महत्त्वकांक्षेने सकल मुस्लीम समाज कित्येक वर्षापासून जामा मशीद मधून गणरायाच्या विसर्जन मिरवणूक वेळी करमाळा शहरातील प्रत्येक गणेश उत्सव मंडळाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून प्रत्येक मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सन्मान करत असतो याचाच एक भाग म्हणून या वर्षी देखील अशाच पद्धतीने आम्ही सदरचा मानवतेच्या एकात्मतेचा , परिवर्तनाचा उपक्रम यावर्षी देखील आम्ही राबवित असल्याची माहिती श्री सय्यद यांनी दिली सदरचा सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण राज्यभरात राबवला जावा असेही आवाहन महाराष्ट्रातील बांधवांना केले

तसेच गणपती विसर्जनामध्ये चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस बांधव व त्यांचे वरिष्ठ अधिकारी , तहसीलदार व तहसील मधील उपस्थित कर्मचारी बंधू या सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी पदाधिकाऱ्यांचा येथे सन्मान जामा मस्जिद ट्रस्ट, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लिम समाज करमाळा बांधवांच्या वतीने दरवर्षी न चुकता केला जातो या बैठकीमध्ये उपस्थित सकल मुस्लीम समाज चे अध्यक्ष जमीर सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे मार्गदर्शक समीर शेख, आझाद शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, रमजान बेग ( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन ) सुरज शेख (सचिव रहनुमा ट्रस्ट) , सोहेलभाई पठाण (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष) जहाँगीर बेग, आलिम पठाण, शाहीद बेग, इकबाल शेख, कलंदर शेख,आरबाज बेग, राजु बेग, शाहरुख नालबंद, सुपरान शेख, बबलु पठाण .कलीम शेख, आरीफ पठाण.कय्युम मदारी.ईरफान सय्यद.अय्युब मदारी.अरबाज शेख.इ मुस्लीम बांधव उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button