जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा कर्याध्यक्ष प्रियांका खटके यांच्या घरी गौरी पुजन व महापुरुषांच्या विचारांच्या पुस्तकांची पूजा
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
ज्या स्त्रीने स्वराज्याचे दोन छत्रपती घडवले व अंधश्रद्धेला खतपाणी न घालता पुण्याची भूमी नांगरली त्या पुण्याला आज विद्येच माहेरघर म्हणले जाते अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशहाचे गेले पाणी भद्र कोपले ताराराणी दिल्लीचे तख्त हालवणारे महाराणी ताराराणी तसेच ज्या मातेने सती न जाता स्वतः राज्य कारभार केला व समाजापुढ एक आदर्श निर्माण केला अशा अहिल्यादेवी होळकर, शिक्षणाची जननी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व सहशिक्षिका फातिमा शेख तसेच व मुक्ता साळवे राणी झलकार बाई डॉ.बाबासाहेबांना त्यांच्या जिवनात सहकार्य करणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून गौरी पूजन केले.ह्याच खऱ्या आमुच्या महालक्ष्मी असून यांचेच घरोघरी पूजन झाले पाहिजे यांचे खरे कार्य आम्हाला जिजाऊ ब्रिगेडमुळे कळाले.
सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा प्रियांका खटके यांनी आज गौरी गणपती निमित्त त्यांच्या जेऊर येथील राहत्या घरी गौरी पूजनाच्या वेळी विविध महामानवांच्या पुस्तके ठेवली आली होती यावेळी विविध पुस्तकांची पूजन देखील यावेळी सौ खटके यांच्या हस्ते देखील करण्यात आले