राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तालुका कार्याध्यक्ष साहिल आतार यांचा सन्मान…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
पिसेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेल चे तालुका कार्याध्यक्ष पदी साहिल आतार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा निमगाव गावचे ज्येष्ठ नेते प्रभाकर सोपान मगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रताप मगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा हि देण्यात आल्या…
सत्काराला उत्तर देताना साहिल आतार असे म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी माढा चे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब आणि माळशिरस तालुक्याचे भावी आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील तसेच ओबीसी सेलच्या माध्यमातून ओबीसी सेलचे नेते ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर,तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांच्याशी एकनिष्ठ राहून माळशिरस तालुक्यात जास्तीत जास्त शाखा काढण्याचे ध्येय बाळगुन मी प्रयत्न करणार आसल्याचे यावेळी सांगितले…
या कार्यक्रमाला निमगाव गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.तसेच वेळापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ अश्विनी भानवसे व उमेश भानवसे यांच्या वतीने निवडीबद्दल साहिल आतार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विझोरी ग्रामस्थ तालुका माळशिरस यांच्यावतीनेही साहिल आतार यांचा सन्मान करण्यात आला…