शहर

प्लास्टिकची ताडपत्री हटवण्याचा वादातून एकाची हत्या….. पालघर जिल्ह्यातील घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील घटना .. तिन्ही आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी केली अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील घोलवड पोलीस ठाणे अंतर्गत तलासरी तालुक्यातील झाई येथे घराच्या रस्त्यालगत पावसाचे पाणी थांबवण्यासाठी लावलेल्या प्लास्टिकची ताडपत्री हटवण्याचा वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही हत्या एका किरकोळ वादातून शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी झाली आहे.

घोलवड झाई मांगेलपाडा येथील दवणे कुटुंबीयांची एकमेकांना लागून बैठी घरे आहेत. येथे जाण्यासाठी एक अरुंद रस्ता आहे. या आरोपी कुटुंबाच्या घरात वरून पडणारे पावसाचे पाणी जात असल्यामुळे त्यांनी हे पाणी थांबवण्यासाठी रस्त्यालगत प्लास्टिकची ताडपत्री टाकली होती. याच तडपत्रीचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे मयत गजानन दवणे यांनी रस्त्यावर येणारी ताडपत्री प्रकाश दवणे यांना काढण्यास सांगीतल्याच्या रागातून प्रकाश दवणे (52), गोविंद दवणे (61)व प्रकाश यांची पत्नी सविता यांनी गजानन दवणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये गजानन यांच्या डोळ्यांवर, तोंडावर, पोटावर, पाठीवर आणि गुप्त भागावर जगदीश दुखापत होऊन मार लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्याचा रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा करून पळून गेलेले आरोपी यांचा ठाव ठिकाणा माहित नसताना देखील पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास कामी तपास पथक सहायक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर घोलवड पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जाधव,पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत देसाई, पोलीस हवालदार जे. एम.कोठारी एच.एच.किणी, पोलीस हवालदार विजय ठाकूर पोलीस हवालदार नरेंद्र पाटील, सुभाष साठे, पोलीस शिपाई केशव कुंदर्गे यांनी अथक प्रयत्न करून या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना वाणगाव येथे अटक केली आहे.याबाबत अधिक तपास घोलवड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड पोलीस करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button