महाराष्ट्र

महाविकास आघाडीकडून सुनिल भुसारा यांनी विक्रमगड विधानसभेसाठी प्रथम उमेदवारी अर्ज केला दाखल

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

१२९-विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनिल भुसारा यांनी सर्वात पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते.

हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून सोमवार दि.२८ ऑक्टोबर ला जनतेच्या उपस्थितीत शक्ति प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी सुनिल भुसारा यांनी सांगितले.१२९-विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट लढत होणार असून तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत, अशावेळी महाविकास आघाडीकडून सुनिल भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे असताना दुसरीकडे महायुती कडून हरिश्चन्द्र भोये यांना उमेदवारी जाहिर झाली आहे.

सुनिल भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म सहित उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी कडून अनेक जागांचे चित्र स्पष्ट झाल्याचे यातून दिसून येत आहे.यावेळी शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश गंधे, जिल्हा प्रमुख अनुप पाटील, काँग्रेस करून घनश्याम आळशी, जमशीद शेख, सीपीएम् चे सचिव किरण गहला, यशवंत बुधर, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लॉबो, महीला जिल्हा प्रमुख अंजली चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button