सदाशिवराव माने विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा…
अकलूज प्रतिनिधी राहुल गायकवाड
येथील विद्यालयामध्ये शिक्षक दिनाच्या निमित्त शिक्षकांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सई होनमाने हिने केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री फुले सर, उपमुख्याध्यापक घंटे सर, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य जाकीर सय्यद सर ,सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक , उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता नववी मधील विद्यार्थी ध्रुव गांधी, शिवम पवार, कैफ अली सय्यद, संस्कृती कोरेकर ,श्रावणी भडकुंबे या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले .या नेटक्या कार्यक्रमाचे नियोजन सौ सावंत मॅडम, सौ सोनवणे मॅडम , सौ झगडे मॅडम, सौ शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन तेजश्री चव्हाण हिने केले.