शहर

मुस्लीम समाजाच्या चळवळीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे बार्शी चे जुबेरभाई बागवान…

आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सोलापूर जिल्ह्या मधील मुस्लिम समाजाची चळवळ आपल्या सामाजिक कार्याने जिवंत करणारा “अवलिया” म्हणजे बार्शी चे जुबेर युनूस बागवान…
मुस्लिम जन समुदायातील कोणतीही व्यक्ती अडचणीत आली असेल तर जातीने लक्ष घालून संबंधित व्यक्तीची अडचण दूर कशी होईल याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या जुबेर बागवान यांना महाराष्ट्रातून ओळख मिळतेय हे मात्र तितकेच खरे…

मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळख असलेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि याच बार्शी शहरामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी सदैव झटत राहणारे जुबेर बागवान म्हणजे एक प्रकारची सामाजिक चळवळच…

सामाजिक कार्याची आवड असल्या कारणाने जुबेर बागवान यांनी “बागवान सोशल फाउंडेशन” ची स्थापना केली,अनेक तरुण सहकाऱ्यांना फाउंडेशनशी जोडून आणि सामाजिक बांधिलकी जोपासत अल्पसंख्याक समाजासाठी सदैव काही ना काही कार्यक्रम राबवत अहोरात्र जनतेची सेवा केली आणि करत हि आहेत…
“बागवान सोशल फाउंडेशन” आणि जुबेर बागवान हे समीकरणच आज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचायचे प्रयत्न करत आहे…

अल्पसंख्यांक समाज,बागवान बंधू आणि बागवान सोशल फाउंडेशन ह्या त्रिकोनांचा यशस्वी पाठपुरावा करून जुबेर बागवान यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांचे पुरस्कार देखील पटकावले असुन आपण ज्या समाजात जन्मलो,वागलो,मोठे झालो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो हि प्रामाणिक भावना कायम जुबेर बागवान यांच्या मनात असते…
भावनिकतेला आपल्या अखंड कार्याची जोड देउन समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या जुबेर बागवान यांना त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय कारिर्दीस टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क च्या अनेकानेक शुभेछा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button