महाराष्ट्र

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय दावे मिळणार…. सेना युनियन कामगार अध्यक्ष बाबा कदम यांच्या पाठपुराव्यांना यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुमारे दिड वर्षे त्यांचे देय दावे मिळाले नाहीत.याबाबत ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’ च्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम, रजा रोखीकरण,सेवा उपदान ई. वेळेवर दिले जात नसुन, तसेच त्यांना पेंशन चालु न केल्याने कर्मचार्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आल्याने सेना युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस रामचंद्र नाथा लिंबारे यांनी ‘आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता.

वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी सेना युनियनशी या विषयावर चर्चा केली यावेळी या चर्चेला उपस्थित असलेले कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर, जेष्ठ चिटणिस संजय वाघ व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून पुढील एक महिन्याच्या आत सर्व प्रलंबित दावे निकालात काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहीती रामचंद्र नाथा लिंबारे यांनी दिली आहे.

त्यासाठी दोन दिवसांत प्रलंबित प्रकरणांची माहीती प्रशासनास सादर करण्यात येणार असुन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 8879270287 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button